निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ‘पाटीदार’ खेळीः भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री

0
168
संग्रहित छायाचित्र.

गांधीनगरः विजय रूपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर भाजपने आज मुख्यमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. भूपेंद्र पटेल यांची आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीच भूपेंद्र पटेल यांचे नाव सूचवले. भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने गुजरातमध्ये प्रभावी असलेल्या पाटीदार समाजाकडे मुख्यमंत्रिपद गेले आहे.

आवश्य वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. मात्र त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे. २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतरही नितीन पटेल यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल, अशी चर्चा होती. तेव्हाही नितीन पटेल यांना डावलून विजय रुपाणी यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली होती.

हेही वाचाः गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा, ‘आप’च्या धसक्याने भाजपने केला नेतृत्व बदल?

 भूपेंद्र पटेल हे घाटलोदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल याही याच मतदारसंघातून निवडून येत होत्या. आज गांधीनंगरमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा