बिहार निवडणूकः महाआघाडीचेच सरकार निश्चित, बिहारने बदल घडवलाः राजदचा दावा

0
177
छायाचित्रः twitter/@yadavtejashwi

पाटणाः बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार, याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट असले तरी महाआघाडीचेच सरकार येणार हे निश्चित आहे, असा दावा राष्ट्रीय जनता दलाने (राजद) केला असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका, अशा सूचना मतमोजणी एजंटांना दिल्या आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेस-राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे. क्षणाक्षणाला निकालाचे कल बदलत आहेत. त्यामुळे या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे. एनडीएचे सरकार पुन्हा येणार की, महाआघाडीचे सत्तारोहण होणार, हा एकच प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात कुतुहल आणि चर्चेचा ठरला आहे. अशातच राजदने महाआघाडीचेच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला आहे.

आम्ही सर्व प्रदेशातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत. सर्व जिल्ह्यांतून मिळत असलेली माहिती आपल्याच बाजूने आहे. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी होईल. महाआघाडीचेच सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. बिहारने बदल घडवून आणला आहे. सर्व उमेदवार आणि मतमोजणी एजंटांनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रातच रहावे, असे राजदने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा