‘जे लोक दारू पितात, ते महापापी; भारतीय म्हणण्यासही लायक नाहीत!’

0
160
संग्रहित छायाचित्र.

पाटणाः जे लोक दारु पितात, ते महापापी, महाअयोग्य आणि भारतीय म्हणण्यासही लायक नाहीत. ते हिंदुस्तानी नाहीतच, शिवाय ते भारतीयही नाहीत. हे मत आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे.

 बिहार विधान परिषदेत सादर करण्यात आलेल्या दारूबंदी कायद्यातील दुरूस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. ३० मार्च रोजी बिहार विधान परिषदेत या दुरूस्ती विधेयकावर चर्चा झाली. त्या चर्चेला उत्तर देताना नितीश कुमार यांनी तळीरामांबाबत हे वक्तव्य केले. जे लोक दारू पितात आणि बापूंच्या भावनांना मानत नाहीत, ते हिंदुस्तानी आहेत, असे मी मानतच नाही. ते भारतीय तर नाहीतच, असे नितीश कुमार म्हणाले.

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सुनिल सिंह यांनी दारु पिणाऱ्या लोकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले खटले मागे घेऊन त्यांची तुरूंगातून सुटका करावी, अशी मागणी केली. या मागणीवर प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले की, मी त्यांना महापापी म्हणेल. जे लोक महात्मा गांधींचे अनुसरण करत नाहीत, ते लोक हिंदुस्तानीही नाहीत, ते अक्षम लोक आहेत, असे मानतो.

हेही वाचाः डॉ. बामुच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. भडांगे निलंबित, तुम्हालाही मागतात का तुमचे गाईड पैसे?

दारू पिणारांना कोणतीही कायदेशीर सवलत मिळणार नाही. बनावट दारू पिल्यामुळे मरणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनाही कोणतीही सवलत किंवा अनुदान मिळणार नाही, असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.

आम्ही अशा कुटुंबांना कोणतीही नुकसान भरपाई देणार नाही. या दुरूस्ती विधेयकाच्या मंजुरीनंतर दारूच्या व्यापाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही नितीश कुमार म्हणाले. गेल्या काही महिन्यात बिहारमध्ये बनावट दारू पिल्यामुळे  अर्धा झडनाहून अधिक घटना घडल्या. त्यात ६० लोकांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हे विधान केले आहे.

बिहारमध्ये एप्रिल २०१६ पासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र या दारूबंदीच्या अंमलबजावणीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत राहिले आहेत. बिहारमध्ये विषारी दारू पिऊन लोकांचा मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगभरात दारूचा किती विपरित परिणाम होत आहे, हे या सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि त्याबाबत बापूंनी मांडलेल्या विचारांचा प्रचार केला पाहिजे, असे नितीश कुमार म्हणाले. दारूबंदीमुळे राज्याच्या महसुलात घट झाली, असा तर्क काही लोक मांडतात, तो चुकीचा आहे, असेही ते म्हणाले.

बिहारमध्ये दारूबंदी लागू केल्यामुळे भाज्यांची विक्री वाढली. त्यामुळे भाज्यांचे उत्पादनही वाढले आहे. आधी दारूवर जो पैसा खर्च केला जात होता, त्या पैश्यातून आता लोक भाज्या खरेदी करू लागले आणि घरच्या अन्य कामावर ते पैसे खर्च केले जात आहेत, असेही नितीश कुमार म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

३० मार्च रोजी बिहार विधान सभेत दारूबंदी व उत्पादन शुल्क दुरूस्ती विधेयक २०२२ मंजूर करण्यात आले. या विधेयकाद्वारे बिहारमध्ये पहिल्यांचा दारूबंदी कायदा सौम्य करण्यात आला आहे. नवी कायद्यानुसार, पहिल्यांदा गुन्हा केल्यावर दंड भरल्यानंतर दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मिळेल. जो आरोपी दंड भरू शकणार नाही, त्याला एक महिना तुरूंगवास भोगावा लागेल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा