२७ वर्षे संसारानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट, मेलिंडा म्हणाल्याः बेपर्वा तुटला संसार!

0
686
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः जगातील सर्वात श्रीमंत चार व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. १३० अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी विवाहपूर्व करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. ‘बेपर्वाईमुळे तुटलेला संसार’  असे वर्णन मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोटाच्या याचिकेत केले असून आम्ही एकत्र राहूच शकत नाही, असेही म्हटले आहे.

६४ वर्षीय बिल गेट्स आणि ५६ वर्षीय मेलिंडा यांनी सोमवारी ट्विटरवर घटस्फोटाची घोषणा केली. १९९४ मध्यो दोघांचे लग्न झाले होते. १३० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीची वाटणी सुकर होण्यासाठी दोघांनी विवाहपूर्व करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. या संपत्तीमध्ये पाच राज्यांत मालमत्ता, खासगी जेट विमान, विस्मयकारक कला संग्रह आणि लक्झरी कारचा ताफा आदींचा समावेश आहे. आपले कुटुंब आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे, असे मेलिंडा यांच्या मोठ्या मुलीने जाहीर केल्यानंतर मेलिंडा यांनी दाखल केलेला घटस्फोटाचा अर्ज समोर आला आहे.

२५ वर्षीय जेनिफर गेट्स यांनी सोमवारी दुपारी इंस्टाग्रामवर घटस्फोटाच्या घोषणेबाबत प्रतिक्रिया दिली. मेलिंडा आणि बिल गेट्स यांना २५ वर्षीय जेनिफर, २१ वर्षीय मुलगा रोरी आणि १८ वर्षीय मुलगी फोबे अशी तीन अपत्य आहेत. भरपूर विचार आणि काम केल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे, असे सारखेच संयुक्त निवेदन बिल आणि मेलिंडा यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

“बिल गेट्स आणि मेलिंडा यांच्यातील संबंधांची सुरूवात पझल्स, समस्यांची उकल आणि गणितांची कोडी सोडवण्यापासून झाली. परंतु २७ वर्षांचा संसार कसा टिकवायचा, याचे कोडे मात्र ते सोडवू शकले नाहीत.”

बिल गेट्स आणि मेलिंडा हे दोघेही बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन चालवतात. २००० मध्ये त्यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली. ‘गेल्या २७ वर्षांत आम्ही तीन अमूल्य मुले वाढवली आहेत. जगातील लोकांना निरोगी आणि चांगले जीवन जगता यावे यासाठी जगभरात काम करणाऱ्या फाऊंडेशनची उभारणी केली आहे. आम्ही दोघेही या फाऊंडेशनमध्ये काम करत राहू. परंतु आमच्या जीवनाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही. आम्ही या नव्या जीवनाची सुरूवात करताना आमच्या कुटुंबासाठी खासगीपणा मिळावा, अशी अपेक्षा करतो, असे या निवेदनात म्हटले आहे.

बिल गेट्स हे आधीपासूनच अब्जाधीश आहेत. त्यांनी  पॉल ऍलन यांच्यासह १९७५ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली. १९८७ मध्ये वयाच्या ३१ वर्षी ते जगातील सर्वात तरूण अब्जाधीश बनले. मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून काम करत असताना याच वर्षी त्यांची मेलिंडाशी भेट झाली होती.  मेलिंडा त्यावेळी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या आणि एका बिझनेस डिनरमध्ये त्या बिल गेट्सच्या जवळच बसल्या होत्या. भेटीच्या सहा वर्षांनंतर दोघांनी लग्न केले.

२०१९ मध्ये मेलिंडा गेट्स यांनी द मोमेंट ऑफ लिफ्ट या आत्मचरित्रात बिल यांच्या भेटीबाबत लिहिले आहे. मी उशिरा पोहोचले. सर्व टेबल भरलेले होते. फक्त एक टेबल रिकामा होता आणि जवळजवळ असलेल्या दोन खुर्च्या होत्या. त्यापैकी एका खुर्चीवर मी बसले. काही मिनिटांनंतर बिल आले आणि दुसऱ्या खुर्चीवर बसले. वर्षभर डेटिंग केल्यानंतर बिल गेट्स यांनी लग्नाच्या साधक बाधक गोष्टींची एक यादी तयार केली, असे मेलिंडा यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

 बोझेसनंतरचा सर्वात मोठा घटस्फोटः बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा जेफ बोझेस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी यांचा २०१९ मध्ये झालेल्या घटस्फोटानंतरचा सर्वात मोठ्या संपत्तीचे विभाजन करणारा घटस्फोट ठरणार आहे. गेट्स यांच्याकडे १३० अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा