बर्ड फ्लूः चिकन, अंडी खायची तर ७० डिग्री तापमानावर अर्धातास शिजवा!

0
293
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देशातील सात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून त्या पार्श्वभूमीवर तुम्ही अंडी किंवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धातास अंश सेल्सिअस तापामानावर शिजवूनच खा, असा सल्ला पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी दिला आहे.

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथील ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. लातूर, बीड, नागपूर, मुंबई, ठाणे, दापोली येथील नमुन्यांचे तपासणी अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. फक्त परभणीच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल आला आहे. उर्वरित नमुन्यांच्या तपासणी अहावालाची प्रतीक्षा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः संकट आलेचः परभणीतील ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळेच मृत्यू, सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश

अंडी किंवा चिकन विशिष्ट तापमानावर अर्धातास शिजवले तर त्याती विषाणू आणि जिवाणू मरून जातात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झआलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला एवढेच सांगणे आहे की, तुम्ही अंडी उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर पदार्थ तयार करणार असाल  अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धासात ७० अंश सेल्डिअस तापमानावर शिजवले पाहिजे. असे केल्यास त्यातील विषाणू मरून जातात आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित असेल, असे पशुसंवर्धन मंत्री केदार यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा फैलाव, मुख्यमंत्री ठाकरे घेणार आज परिस्थितीचा आढावा

२०१६ मध्ये आलेला बर्ड फ्लू आणि २०२१ मध्ये आलेला बर्ड फ्लू यामध्ये खूप फरक आहे. मागच्या वेळी कोरोना नव्हता. यावेळी कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, असे केदार म्हणाले.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर राज्यांप्रमाणेच केंद्र सरकारनेही सतर्कता बाळगणे जरूरी आहे. महाराष्ट्र सरकारने अत्यंत आधुनिक अशी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आहे. याच प्रयोगशाळेत सर्व नमुने तपासता येऊ शकतात आणि आम्हाला नमुने तपासणीसाठी भोपाळला जाण्याची गरज भासणार नाही. मात्र केंद्र सरकारने अद्याप या प्रयोगशाळेत नमुने तपासण्याची परवानगी दिलेली नाही, असेही केदार म्हणाले. केंद्राने तातडीने ही परवानगी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

परभणी जिल्ह्यातील नमुने ज्या दिवशी घेण्यात आले, त्याच दिवशी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तो परिसर बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तिथून कुठलाही पक्षी बाहेर जाणार नाही. तेथे काम करणारे लोकही बाहेर येणार नाहीत आणि बाहेरून कोणतीही व्यक्ती त्या परिसरात जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करण्यात आले आहे, असेही केदार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा