देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टर माइंडः मलिकांचा आरोप, शेअर केले फोटो

0
1052
छायाचित्रेः नवाब मलिक यांच्या ट्विटर हँडलवरून साभार.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली. पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी सकाळीच चलो भाजप और ड्रग्ज पेडलर के संबंधो पर बात करते है.. म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एका ड्रग्ज पेडलरसोबतचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस हेच राज्यातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टर माइंड आहेत. पडद्यामागून तेच हे सगळे घडवून आणत असून त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला. जयदीप राणाचा फडणवीसांसोबत संबंध काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

मी फोटो ट्विट केलेला व्यक्ती जयदीप राणा आहे. सध्या तो साबरमती जेलमध्ये आहे. जयदीप राणाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नी अमृताने एक गाणे गायले होते. नदी संरक्षण अभियानासाठी रिव्हर साँग बनले होते. त्यात सोनू निगम आणि अमृता यांनी गाणे गायले होते तर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणाने अर्थसहाय्य पुरवले होते. राणा हा ड्रग्ज पेडलर आहे. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपतीच्या दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस- जयदीप राणा एकत्र आहेत. तसे फोटोही आहेत. हे प्रकरण राज्यातील ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

जयदीप राणासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे. फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्जचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. राज्यातील ड्रग्ज रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा आरोपही मलिक यांनी केला आहे. ड्रग्ज प्रकरणाचे मास्टर माइंड देवेंद्र फडणवीस असल्याचा आम्हाला संशय आहे, असेही मलिक म्हणाले.

अमृता फडणवीसांच्या फोटोमुळे खळबळः तत्पूर्वी मलिक यांनी राजकीय विश्लेषकांनी केलेल्या एका ट्विटचा आधार घेत सकाळीच अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला. या फोटोत दिसत असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर आहे. चलो आज भाजप और ड्रग्ज पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है… म्हणत मलिकांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणासोबतचाही फोटो शेअर केला. गणपतीच्या दर्शनाच्या वेळी फडणवीस आणि जयदीप राणा या फोटोत एकत्र दिसत आहेत.

फडणवीस म्हणाले- मी बॉम्ब फोडेनः नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे. आता दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्ज संदर्भातही बोलू नये. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे सर्व पुरावे मी मीडियासमोर मांडणारच आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही मी हे सगळे देणार आहे. ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल. त्यामुळे दिवाळी संपण्याची वाट बघा, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा