देवेंद्र फडणवीसांनी क्रांतिकारी समाजसुधारक शाहू महाराजांना संबोधले ‘सामाजिक कार्यकर्ते’!

2
488
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लोककल्याणकारी राजे, बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांतील आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे क्रांतिकारी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क ‘सामाजिक कार्यकर्ते’ संबोधून शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून छत्रपती शाहू महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा भाजपचा अजेंडा तर नाही ना?  असा सवाल केला जात आहे.

छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत. महात्मा जोतीबा फुले यांच्या मानवतावादी कार्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी कोल्हापूर संस्थानची गादी त्यांच्या हाती आल्यानंतर क्रांतिकारी सुधारणा राबवल्या. शिक्षणावरील उच्चवर्णीयांच्या मक्तेदारीस विरोध करून बहुजन समाजातील लोकांना शिक्षण घेता यावे यासाठी अथक प्रयत्न केले. बहुजन समाजासाठी सरकारी नोकऱ्यांत आरक्षणाची तरतूद केली. स्त्री दास्यत्वमुक्त होण्यासाठी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. अशा या थोर क्रांतिकारी समाजसुधारकास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ संबोधले आहे. समाजसुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यातील फरक न कळण्याइतके देवेंद्र फडणवीस हे अज्ञानी नक्कीच नाहीत. तरीही त्यांनी त्यांच्या ट्विटरवर छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनी श्रदांजली अर्पण करताना ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा उल्लेख ठळकपणे केल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

‘थोर सामाजिक कार्यकर्ते वंचितांचे शिक्षण, हक्कांच्या पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मतिदिनी शत शत नमन’ असे देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.

६ जुलै १९०२ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील, अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते. छत्रपती शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा ‘सामाजिक कार्यकर्ते’ म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला होता. देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटमुळे तत्कालीन ‘सामाजिक कार्यकर्ते’ अद्यापही जिवंत असल्याचेच हे द्योतक आहे की काय?, असा सवाल यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

2 प्रतिक्रिया

  1. महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री एवढा बावळट असूशकतो का ?
    की ते , संघाचा बहुजन विरोधी ऐजंडा राबवत आहेत हे कळण्याऐवढे अज्ञानी राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र नक्कीच नाही….!

    टरबुजा यामुळेच म्हणत असावे…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा