यापुढे पहाटेच्या वेळी शपथ घेणार नाहीः देवेंद्र फडणवीसांची ‘शपथ’!

0
828
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालेले असतानाच यापुढे पहाटे शपथ घेणार नाही, अशी ‘शपथ’ फडणवीसांनी आज घेतली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी फडणवीस आज औरंगाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. भल्या पहाटेच्या शपथविधीच्या वर्षपूर्तीबाबत पत्रकारांनी फडणवीसांना छेडले असता  जे झाले तरे झाले. यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी दिसेल ती पहाटेची वेळ नसणार आहे. यापुढे तुम्हाला योग्यवेळी शपथविधी दिसेल, असे फडणवीस म्हणाले. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात, असे सांगतानाच पहाटेच्या शपथविधी सोहळ्यावर पुस्तक लिहिणे सुरु आहे, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचाः ‘भल्या पहाटेच्या शपथविधी’ची वर्षपूर्तीः वर्ष उलटले तरी भाजपचे सत्तेचे स्वप्नरंजन संपेना!

महाविकास आघाडीचे सरकार चार वर्षे नाही तर आणखी वीस वर्षे चालवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत विचारले असता त्यांनी कितीही स्वप्ने पाहिली तरी त्यांना जनतेने निवडून दिलेले नाही, हे त्यांना माहीत आहे. हे सरकार बेईमानी करून आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ चालेल याबाबत मी भाष्य करणार नाही, ते आपोआपच कळेल, असेही फडणवीस म्हणाले.

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला, असे फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा