माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

0
279
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः फडणवीस यांनीच ही माहिती दिली.

 लॉकडाऊनपासून मी प्रत्येक दिवशी काम करत आहे. परंतु मी थोडा वेळ थांबले पाहिजे, असे देवाला वाटले असावे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि मी विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषधे आणि उपचार घेत आहे, असे फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि प्रत्येकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. या दौऱ्यात असंख्य शेतकऱ्यांसह भाजप नेते आणि कार्यकर्तेही त्यांच्या संपर्कात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा