माझे शब्द लिहून ठेवा, ‘बाप-बेटे’ आणि भाजपचे अन्य नेते तुरूंगात जाणारचः संजय राऊतांचा इशारा

0
146
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी गैरव्यवहार केला नाही तर मग अटकपूर्व जामिनासाठी त्यांची इतकी पळापळ का सुरू आहे? माझे शब्द लिहून ठेवा आगामी काळात बाप-बेटे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करणारे भाजप नेते तुरूंगात जाणारच, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला.

पीएमसी घोटाळा, खंडणी यासारखी अनेक प्रकरणे आजपर्यंत दाबून ठेवण्यात आली होती. आता बरेच लोक समोर येऊ लागले आहेत. ते जर निर्दोष आहे तर बाप-बेटे अटकपूर्व जामिनासाठी का धावपळ करत आहेत? कोणत्या गुन्ह्यात अटक होणार याचीच स्पष्टता नाही तर मग हे बाप-बेटे या कोर्टातून त्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी दारोदार धावाधाव का करत आहेत? त्याची तुम्हाला गरज का पडते? यातच सगळे स्पष्ट होतेय. मी जे साडेतीन लोक म्हणालो, ते तुम्ही मोजत राहा, असेही राऊत म्हणाले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी भाजपचे साडेतीन लोक म्हणालो होतो. ते नेते कोण, त्यांची नावे मला विचारली जात आहेत. पण मी आता नावे दिल्यास ते नेते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. जसजशी त्यांना अटक होईल, तसतसे तुम्हाला कळेल. पण माझे शब्द लिहून ठेवा. हे बाप-बेटे आणि मोठमोठ्या गप्पा मारणारे भाजपचे इतरही लोक नक्कीच तुरूंगात जाणार, असेही राऊत म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

आर्यन खानला एनसीबीच्या एसआयटीने क्लीनचीट दिली आहे. त्यावरूनही संजय राऊत यांनी निशाणा साधला. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलेच नव्हते, असे एसआयटीने सांगितले आहे. असा बनाव आमच्या प्रत्येकाच्याच बाबतीत केला जात आहे, हे उघड होईल. आतापर्यंत मी या प्रकरणात पडलो नव्हतो. पण आता मी समोर आलोय. आता मी सगळ्यांचे मुखवटे उतरवून त्यांना तुरूंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही, मार्क माय वर्ड्स, असे राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा