किरीट सोमय्यांचा ३०० कोटींचा भ्रष्टाचार, अमित शहांच्या नावेही वसुलीः संजय राऊतांचा नवा बॉम्ब

0
167
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवई परिसरातील एका एसआरए प्रकल्पात ४३३ बोग लोक घुसवून तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. परवानगी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही ५० कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगून पैसे उकळल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केला. किरीट सोमय्यांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीसांच्या नावे धमकावत गेल्या काही वर्षांत साडेसात हजार कोटी रुपये जमा केल्याचा दावाही राऊतांनी केला.

पवई परिसरातील पेरूबाग एसआरए म्हणजेच पुनर्वसन प्रकल्पात किरीट सोमय्या आणि त्यांच्या एजंटांनी ४३३ बोगस लोकांची नावे घुसवली. हे लोक या जागेचे मूळ रहिवासी नव्हते. किरीट सोमय्या यांच्या एजंटांनी या प्रत्येक व्यक्तीकडून २५ ते ५० लाख रुपये घेतले. या हिशेबाने किरीट सोमय्यांनी तब्बल ३०० ते ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. मी या सगळ्यांची कागदपत्रे ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून या प्रकरणाची तक्रार करणार आहे, असे राऊत म्हणाले.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या काही वर्षांत किरीट सोमय्यांनी तब्बल ७ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार केला. पवई परिसरातील पुनर्वसन प्रकल्पात बोगस लाभार्थींची नावे घुसवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्यावेळी मंजुरीसाठी देवेंद्र फडणवीसांना ५० कोटी रुपये दिल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले. अशाच प्रकारे दिल्लीतील काही नेत्यांच्या धमक्या देऊन पैसे किरीट सोमय्या पैसे उकळत असल्याची माहिती माझ्याकडे आहे. या नेत्यांमध्ये अमित शाह यांचाही समावेश आहे. किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही पैसे वसूल केले असतील, पण फडणवीस या सगळ्यात सहभागी असतील, असे मला वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.

 किरीट सोमय्या यांच्या विरोधात माझ्याकडे अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत. माझ्याकडे त्यांच्या विरोधातील २११ प्रकरणे आहेत. आता मी रोज एकएक प्रकरण बाहेर काढेन, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

…तर लोक तुमचीही धिंड काढतीलः किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वतःलाच मारहाणार आहे. भाजपमधील काही नेते किरीट सोमय्यांच्या बाजूने बोलत आहेत. त्याच चंद्रकांत पाटलांचाही समावेश आहे. या सगळ्यात चंद्रकांतदादांनी पडू नये. लोक लवकरच किरीट सोमय्या यांचे कपडे उतरवून त्यांची धिंड काढतील. तुम्हीही मध्ये पडलात तर लोक तुमचीही धिंड काढतील, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा