पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या मार्गावर?, 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर करणार वेगळी घोषणा

2
16685
संग्रहित छायाचित्र.

बीड: अजित पवारांशी हातमिळवणी करून भाजपने स्थापन केलेले देवेंद्र फडणवीस सरकार साडेतीन दिवसांतच कोसळल्यानंतर राजकीय पुनर्वसनाचे मार्गच खुंटल्यामुळे भाजपचे काही नेते आता वेगळ्या मार्गाने जाण्याचा विचार करत असून त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे. पंकजा मुंडेही भाजप सोडण्याचा विचार करत असून 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी त्या गोपीनाथ गडावर मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. ‘आज राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या संदर्भाचा विचार करून आपला पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे?’ या सगळ्या गोष्टींचा विचार करून 12 डिसेंबर रोजी त्या भूमिका स्पष्ट करणार असल्याची घोषणा त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून दारून पराभव झाल्यापासूनच पंकजा मुंडे प्रचंड नाराज आहेत. भाजपचे सरकार आले तर किमान विधान परिषदेवर जाऊन राजकीय पुनर्वसन होण्याची आशा त्यांना होती खरी, परंतु देवेंद्र फडणवीसांचे सरकार साडेतीन दिवसांतच कोसळले आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे भाजपत राजकीय पुनर्वसन होण्याच्या पंकजा मुंडेंच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळेच त्या वेगळा विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये तसे स्पष्ट संकेतच पंकजांनी दिले आहेत. ‘…मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जबाबदारी म्हणुन राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे…आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.’ असे पंकजांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवसेना हाच बेस्ट ऑप्शन?

परळी मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. ते मंत्री झाले तर बीड जिल्ह्यातील आणि विशेषतः परळी मतदारसंघातील आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवणे अवघड जाईल, याची जाणीव पंकजांना झाली आहे. त्यामुळे आपला राजकीय सुभा शाबूत राखण्यासाठी त्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी शक्यता पंकजांचा जवळच्या सूत्रांनी व्यक्त केली.

2 प्रतिक्रिया

  1. पंकजा ताई व धनंजय मुंडे ह्या बहिण भावाने एक विचाराने रहावे पंकजा ताईने दिल्ली व धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात असे विभागुन कामे करावी तसेच एकाच पक्षात रहावे तेही राष्ट्रवादी पक्षात हे माझे वैयक्तिक मत आहे बबनदादा काकड ठाणगांव सिन्नर

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा