रावसाहेब दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाले ‘दोन महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…’

0
522
संग्रहित छायाचित्र.

जालनाः आपली खास जालना स्टाइल भाषाशैली आणि अस्सल ग्रामीण भाषेतील टोलेबाजी यामुळे कायम चर्चेत राहणारे भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना तोल सुटला. बदनापूर येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला… दोन महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या काहीच सांगू शकत नाही कोणी… अशा एकेरी भाषेत दानवेंनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले.

जालना जिल्ह्यातीला बदनापूर नगरपंचायतीची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे. दानवे हे या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले आहेत. येथे आयोजित एका प्रचारसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना दानवेंचा तोल सुटला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी भाषेत केला. बिना मुख्यमंत्र्यांचे कुठे राज्य चालते का? या तीन महिन्यांत कोण्या शिवसेनेच्या मंत्र्याला चार्ज जदिला असता तर राज्य कारभार नीट चालला नसता का? असे दानवे म्हणाले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

 ‘हे काय म्हणतात, आमचं कुटुंब आमची जबाबदारी. मुख्यमंत्री परभणीला आले. त्यांना हॉटेलवाले भेटले. त्यांनी सांगितलं कर्ज काढून हॉटेल बांधले. बँखवाले कर्जासाठी चकरा मारत आहेत. आम्हाला पॅकेज द्या. मोदींनी जसं पॅकेज दिलं तसं राज्यातही आम्हाला पॅकेज द्या आणि मुख्यमंत्री म्हणतात आपलं कुटुंब आपली जबाबदारी. हा मुख्यमंत्री कुटुंबाचा जबाबदार आहे की राज्यातील १२ कोटी लोकांचा जबाबदार आहे हे मला तुम्ही सांगा. असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला. आतार तर दोन महिन्यांपासून कुठे आहे पठ्ठ्या हे काहीच सांगू शकत नाही कुणी’, असे दानवे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा