विजया रहाटकर यांचा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा

0
374
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे अराजकीय असून सरकार बदलले तरी या पदावरील व्यक्तीला पदावरून दूर करता येणार नाही, अशी भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी अखेर मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरी रहाटकर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कायम होत्या. 2013 मध्ये दाखल झालेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत राजकीय नियुक्त्याही आम्हीच करायच्या काय?असा सवाल करत 5 फेब्रुवारीपर्यंत महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

हेही वाचा: सत्ता गेली तरी पद सोडवेनाः महिला आयोगाचे अध्यक्षपद राखण्यासाठी रहाटकर सुप्रीम कोर्टात!

उद्या बुधवारीला ( 5 फेब्रुवारी) राज्य सरकारकडून याबाबत निर्णय होण्याच्या आतच विजया रहाटकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.  विजया रहाटकर यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवीन नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा