पंकजा मुंडेंना भाजप खा. संजय काकडेंचा टोला: ज्यांना मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार आणि काय दिवे लावणार?

0
109
संग्रहित छायाचित्र.

पुणेः भाजप नेत्या आणि माजी ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्थानिक पातळीवर जातीपातीचे राजकारण केल्यामुळेच त्यांचा पराभव झाला आहे.पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव हा त्यांचा स्वतःचा होता. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी त्या आता दुसर्‍यावर खापर फोडत आहेत. ज्यांना आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार आणि काय दिवे लावणार?, असा सणसणीत टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

 गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो. माझ्या वडिलांनी आयुष्य झिजवून भाजप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. हा पक्ष माझ्या बापाचा पक्ष आहे. मी पक्ष सोडणार नाही. हवे तर पक्षाने मला काढून टाकावे, असे विधान केले होते. पंकजा मुंडे यांचे हे विधान भाजपच्या सच्चा कार्यकर्त्याला दुखावणारे आहे. पाच वर्षे त्यांच्याकडे महत्वाची खाती होती. एवढे असताना जर तुम्हाला तुमचा मतदारसंघ सांभाळता येत नाही तर तुम्ही महाराष्ट्रात काय फिरणार आणि काय दिवे लावणार? ज्याला मतदारसंघ सांभाळता येत नाही, त्या व्यक्तीने मी पक्ष वाढवेल, मी हे करेल, ते करेल, असे बोलणे गरजेचे नव्हते.पंकजांनी परळीत घेतलेला मेळावा हा अस्तित्व टिकवण्यासाठी होता. त्या मेळाव्याची गर्दी गोपीनाथ मुंडे यांच्या नावामुळे होती. पंकजांसाठी तेथे कुणीही गेले नव्हते, अशी तोफ काकडे यांनी डागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा