शंखनाद आंदोलनः भाजप कार्यकर्त्यांचा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न

0
76
भाजपच्या पंढरपुरातील आंदोलनाचे दृश्य.

मुंबई/पंढरपूरः राज्यातील मंदिरे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभर शंखानाद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल- रूक्खमीणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.

पंढरपुरात नामदेव पायरीजवळ जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात भाजपचा झेंडा घेऊन मंदिर खुले करावे, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पुण्यात कसबा गणपतीसमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप नेते मोदीविरुद्ध आंदोलन करणार काकाँग्रेसचा सवालः दरम्यान, भाजपच्या या आंदोलनावरून काँग्रेसने भाजपला बिनतोड सवाल केले आहेत. केंद्र सरकारने उत्सवांवर निर्बंध घालण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते मोदींविरुद्ध आंदोलन करणार का? भाजप सरकारांनी कावड यात्रेवर बंदी का घातली?, असे सवाल करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला ‘शंखासुरा’ची उपमा दिली आहे. शंखासूर भाजप आंदोलनातून सरळ सरळ कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहे. चंद्रकांत पाटील स्वतः मास्क घालत नाहीत. मोदी सरकारच्या निर्देशांनाही किंमत देत नाहीत. अध्यात्मिक आघाडी या थोतांडातून अध्यात्म या पवित्र मार्गाचे विकृतीकरण हिंदू धर्माचा अवमान आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा