भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, नाना पटोलेंचा दावा, कोणत्या दिवशी फुटणार त्याचाही सांगितला मुहूर्त

0
1099
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजप सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट थांबवण्यासाठीच राजभवनाचे रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आले आहे आणि राज्यपालांचा वापर सुरू आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 राज्यपालांनी विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. मागच्या काळात भाजपने अनेक नेत्यांना आयात करून ठेवले आहे. भाजपचेही काही आमदार आहेत, त्यांनाही वाटते आपण काय मंत्री होणार नाही. त्यामुळे तेही फुटणार आहेत, असेही पटोले म्हणाले.

भाजपचे अनेक आमदार, नेते संपर्कातः राज्यात जेव्हापासून महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, तेव्हापासून आठ दिवसांत मंत्रिमंडळ बदलू, सत्ते येऊ असे भाजपकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. पण हे करता करता आता दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे आता भाजपमध्ये खूप चलबिचल सुरू झाली आहे. भाजपचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाच्या असतील, असे पटोले म्हणाले.

… त्या दिवशी भाजप फुटेलः राज्यपाल नियुक्त बारा आमदार ज्या दिवशी महाविकास आघाडीचे होतील, त्यादिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे राज्यपालांकडून १२ आमदारांची नियुक्ती टाळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी भाजप अनेकांवर अन्याय करत आहे, असे पटोले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा