अभिनेता आमिर खान- किरण राव यांचा घटस्फोट, १५ वर्षांच्या संसारानंतर झाले विभक्त

0
691
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांच घटस्फोट झाला आहे. दोघांनी एकमेकांच्या सहमतीनेच विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी दोघांचे लग्न झाले होते. तब्बल १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या घटस्फोटाची माहिती दिली आहे.

आम्ही १५ वर्षे एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आम्ही प्रत्येक क्षण हसत खेळत घालवला आहे. आता आम्ही आमच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू करत आहोत. आता आम्ही पती-पत्नी नसू. फक्त आमच्या मुलाचे पालक असू. कुटुंबाचा भाग असू. आम्ही काही महिन्यांपूर्वीच वेगळे होण्याचा विचार केला होता. आता आम्ही अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे सहपालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ, असे दोघांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र.

आमच्या मुलाचा सांभाळ करण्याबरोबरच आम्ही सिनेमा, पाणी फाऊंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू, असेही आमिर खान आणि किरण राव यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

लगानच्या सेटवर झाली होती पहिली भेटः लगान सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काहीवेळ रिलेशनशिपमध्ये घालवल्यानंतर २८ डिसेंबर २००५ मध्ये दोघांनी लग्न केले होते.

किरणशी दुसरे लग्नः किरण रावशी आमिर खानचे दुसरे लग्न होते. त्याआधी आमिर खानने अभिनेत्री रीना दत्तसोबत २००२ मध्ये लग्न केले होते. १६ वर्षांनंतर आमिर खानने रीना दत्तला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिर खानला आयला आणि जुनेद  ही दोन मुले आहेत.

सरोगसीतून मुलाचा जन्मः किरण आणि आमिर खानला आझाद नावाचा मुलगा आहे. तो १० वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीतून झाला. गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे किरण राव आणि आमिर खानने सरोगसची निर्णय घेतला होता. त्यानतंर सरोगसीद्वारे २०११ मध्ये आझादचा जन्म झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा