बॉलीवूडचा खरा ‘चॉकलेट बॉय’ गेला, अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

0
106
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आपल्या सदाबराह अभिनयाने चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते ६७ वर्षांचे होते. चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते इरफान खान यांच्या निधनाला चोवीस तास उटलत नाहीत तोच ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर हा दुसरा आघात झाला आहे.

 बुधवारी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेऊन गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच ते भारतात परतले होते. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे बिगबी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून दुखः व्यक्त केले आहे. ‘तो गेलाय…ऋषी कपूर गेलाय…. आणि मी उद्धवस्त झालोय…’ अस अमिताभ यांनी म्हटले आहे.

बॉलीवूडच्या दुनियेतील सर्वात मोठ्या कपूर घराण्याचे वारस असलेले ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला होता. ऋषी कपूर हे राज कपूर यांचे द्वितीय चिरंजीव होते. ऋषी कपूर यांनी त्यांचे वडिल राज कपूर यांच्या ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. बॉबी (१९७३) हा डिम्पल कपाडियासोबतचा त्यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांना १९७४ चा उत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. १९७३ ते २००० या काळात त्यांनी सुमारे ९२ रोमँटिक चित्रपटात भूमिका केल्या. अमर अकबर अँथोनी, लैला मजनू, द बॉडी, प्रेमरोग, १०२ नॉटआऊट, मुल्क, रफू चक्कर, सरगम, कर्ज, बोल राधा बोल, चांदणी हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा