‘दिल्लीत प्रचाराला बोलावून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना वाटायला लावल्या चिठ्ठ्या!’

7
46653
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराची पत्रके वाटताना चंद्रकांत पाटील.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रातून दिल्लीत गेलेल्या भाजप नेत्यांचे एकेक रंगतदार किस्से समोर येऊ लागले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी दिल्लीत गेले असून ते कार्यकर्त्यांसोबत दिल्लीच्या गल्लीबोळात फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून भाजपवाले दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत, अशी टीकाही होऊ लागली आहे.

 भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील काही आघाडीचे भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला गेले आहेत. विनोद तावडेंच्या प्रचारसभेला बोटावर मोजण्याइतकेच लोक उपस्थित असल्याची छायाचित्रे त्यांनीच त्यांच्या ट्विटर हँडलवर टाऊन टीका ओढवून घेतली होती. एवढी तुफान गर्दीची सभा कधीच पाहिली नाही, पाय ठेवायलाही जागा नाही, असा त्या टिकेचा सूर होता. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची दोन छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. या छायाचित्रांत चंद्रकांत पाटील दिल्लीच्या गल्लीबोळात कार्यकर्त्यांसोबत फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याचे या छायाचित्रांत दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवरही टीका होत आहे. ‘ दिल्लीत प्रचाराला म्हणून बोलावलं अन् चिठ्ठ्या वाटायला लावल्या. भाजपवाले दिल्लीत महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत,’ अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. तर मराठी म्हणून वाईट वाटले पण हीच त्यांची लायकी आहे, अशी बाणेदार टीका एका नेटकऱ्याने केली आहे.

7 प्रतिक्रिया

  1. भाजपाच्या वरिष्ठ म्हणजे चौकीदार चोर आणि तडीपार ह्या दोन नालायकांनी ह्यांची लायकी काय आहे ते दाखविली त्यांचा लायकीप्रमाणे त्यांना काम देण्यात आली आहेंत. जसं कुत्र्यांना म्हणा किंवा भिकाऱ्यांना म्हणा दरवाजाच्या बाहेरचं उभं केलं जातं त्याचं प्रमाणें ह्या नालायक जोडगोळीने ह्या महाराष्ट्रातील नेत्यांची, कामचोरांची लायकी दाखविली??? अजून करा म्हणें उदोउदो हर हर मोदी आणि घर घर मोदी, ज्याला हे स्वतःचा सेनापती पीएम, एचएम समजतात तेंच मुळात ह्या मूर्खांच्या जीवांवर निवडून आले आहेंत लायकी नसतांना हेंच सत्य आहे.

  2. महाराष्ट्रातील मराठी माणूस दिल्ली मध्ये जाऊन चिट्या वाटत असेल महाराष्ट्राची अब्रू तर गेलीच पण मराठी माणसांचीही घालवली. राज्यातील नेत्यांना दिल्लीत हिच का मोठी संधी व माजी मंत्र्यांचा आदर. आतातरी शाने व्हा सुधारा.

  3. चिठ्ठी वाटणे हा प्रचाराचा भाग आहे की नाही ????
    महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष स्वतः पुढाकार घेवून कार्यकर्ते ची कामे हाती घेतली आहे का ते तपासा.न्यूज मध्ये येण्या साठी का होईना काही हरकत नाही.पक्ष जे काम देईल ते करतात आहे ना बस मग, कोणी किती ही वाईट साईट बोलो. बीजेपी वर टोमणे मारणे हा विरोधकांचा डाव आहे. दिल्लीत बीजेपी जिंकली तर तुम्ही च तोंडात बोट टाकून EVM ईव्हीएम ओरडत बसा. कारण बीजेपी जिंकली तर हा भक्कम पूरवा तुम्हीच पुरवला आहे तो पुरता आहे.
    आम्हाला अभिमान आहे बीजेपी महाराष्ट्राचा. राहिली लाइकी तर केलेले कर्म फुकट जात नाही आणी कोणी लाइकी काढली तर ती जात नाही.

  4. एके काळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊन गेला होता… तो नियोजनपूर्वक कार्य करण्यासाठी अन् त्याने केले देखील… पण ग्राउंड लेवल वर येऊन नाही तर आपल्या पदाचा सन्मान ठेऊन, बरं का!

    पण हे म्हणजे हिमालयाच्या मदतीला नव्हे, तर लग्नात स्वागतेच्छूक मंडळीला वाडप्याचे काम करायला लावणे होय…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा