डॉक्टरांनी केली होती माझ्या मृत्यूच्या घोषणेची तयारीः ब्रिटिश पंतप्रधान जॉनसन यांचा खुलासा

0
78
संग्रहित छायाचित्र.

लंडनः कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा जर मृत्यू झाला तर काय करायचे?  याची तयारी डॉक्टरांनी करून ठेवली होती. ते क्षण खूपच कठीण होते. मी ते नाकारत नाही. स्टॅलिनच्या युगात ज्या पद्धतीने मृत्यू होत होता, तशी स्थितीची डॉक्टरांनी तयारी करून ठेवली होती, असा खुलासा खुद्द बोरिस जॉनसन यांनीच केला आहे.

कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर बोरिस जॉनसन यांनी ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीत हे खुलासे केले आहे. मी फारशा चांगल्या स्थितीत नव्हतो. आपत्कालीन स्थितीची तयार करून ठेवण्यात आली आहे, हे मलाही समजत होते. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर डॉक्टरांनी त्याचीही तयारी करून ठेवली होती, असे जॉनसन म्हणाले.

इन्सेटिव्ह केअर युनिटमध्ये इंडिकेटर्स चुकीच्या दिशेनेच जात होते आणि आता कोरोनातून आपली सुटका नाही, याची मला खात्री पटली होती. डॉक्टरांनी मला फेस मास्क दिला. त्यातून मला बराच काळ कित्येक लिटर ऑक्सिजन देण्यात आला, असे बोरिस जॉनसन म्हणाले. गेल्या महिन्यात सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या जीवन –मृत्यूच्या संघर्षात बोरिस जॉनसन ‘ मी यातून कसे बाहेर पडणार?’ असे वारंवार स्वतःलाच विचारत होते.

बोरिस जॉनसन यांनी स्वतःमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर आधी स्वतःला होमक्वारंटाइन करून घेतले होते. आठवडाभरानंतरही कोरोनाची लक्षणे कायम राहिल्यानंतर त्यांना ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे गेल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच त्यांना इन्टेंसिव्ह केअर यूनिटमध्ये पाठवण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. काही दिवसांतच माझी एवढी प्रकृती खालावली यावर विश्वास ठेवणेच अवघड होते. मी प्रचंड निराश झालो होतो, हे मला आठवतेय. मी बरा का होत नाही, हे मला समजू शकत नव्हते, असे जॉनसन म्हणाले.

प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता म्हणून ठेवले मुलाचे नावः जॉनसन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर अवघ्या १७ दिवसांनीच त्यांना मुलगा झाला. इन्टेंसिव्ह केअर यूनिटमध्ये बोरिज जॉनसन यांचे प्राण वाचवण्यात निकोलस हार्ट आणि निकोलस प्राइस या दोन डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे त्यांनी या दोघांचेही मधले नाव वापरून आपल्या मुलाचे नाव विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉनसन असे ठेवले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा