अर्थसंकल्पीय अधिवेशनः दोन मिनिटांतच भाषण गुंडाळून राज्यपालांचा सभागृहातून काढता पाय…

0
227

मुंबईः राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज अपेक्षेप्रमाणे वादळी सुरूवात झाली. ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ असे वक्तव्या करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषणासाठी विधिमंडळात येताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तुफान घोषणाबाजी केली. राज्यपालांनी अभिभाषणाला सुरूवात करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यपाल कोश्यारींवर आपले अभिभाषण अवघ्या दोन मिनिटांत आटोपते घेऊन सभागृहातून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली. दरम्यान, आता राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्याचा विचार सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी उल्लेख करत ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’ असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही जोर धरू लागली . कोश्यारींच्या त्याच वक्तव्याचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही तीव्रतेने पहायला मिळाले.

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?: Video: समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?, राज्यपाल कोश्यारींचे औरंगाबादेत वादग्रस्त वक्तव्य

राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही अधिवेशनाची सुरूवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. राज्यपालांनी अभिभाषण करतात आणि अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ होतो. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषणासाठी सभागृहात आले, तेव्हाच सत्ताधारी आमदारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यपाल कोश्यारी अभिभाषणाला उभे राहिले आणि त्यांनी २०२२ वर्षातील राज्य विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनात मी तुमचे स्वागत करतो. माझे शासन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या आशीर्वादाने… असे राज्यपाल कोश्यारी म्हणतात सत्ताधारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. या गोंधळामुळे राज्यपाल कोश्यारी यांनी अनपेक्षितपणे अवघ्या दोनच मिनिटांत आपले अभिभाषण आटोपते घेतले आणि सभागृहातून काढता पाय घेतला.

 राज्यपाल कोश्यारींनी अनपेक्षितपणे सभागृहातून काढता पाय घेतल्यानंतर काही क्षण सर्वच जण बुचकळ्यात पडले. परंतु राज्यपाल कोश्यारी राष्ट्रगीतासाठीही न थांबता निघून गेल्याचे टिकास्त्र सत्ताधारी आमदारांनी सोडले आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून राज्यपालांच्या या कृतीचा निषेध केला.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ही लाज वाटण्यासारखी गोष्ट- आदित्य ठाकरेः राज्यपालांना अवघ्या दोनच मिनिटांत अभिभाषण गुंडाळावे लागल्याच्या घटनेवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यपालांनी निघून जाणे, त्यांच्या भाषणावेळी त्यांचा अपमान होणे हे सर्व अयोग्य आहे. आम्हाला या गोष्टींमुळे धक्का बसला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा