पती किती क्रूर असला तरी दोघांतील शरीर संबंधाना बलात्कार म्हणता येईल का?: सुप्रीम कोर्टाचा सवाल

0
565

नवी दिल्लीः एखादे जोडपे पती-पत्नी म्हणून एकमेकांसोबत रहात असेल तर पती कितीही क्रूर असला तरी त्या दोघांमधील शरीर संबंधांना बलात्कार म्हणता येईल का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीस शरद बोबडे, न्या. ए.एस.बोपन्ना आणि न्या. व्ही राजसुब्रमण्यम यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने हा सवाल उपस्थित केला आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याची बाजू मांडणाऱ्या वकील विभा दत्त मखीजा यांनी आरोपी आणि महिला दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमद्ये रहात होते. त्यानंतर या महिलेने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांमध्ये या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली, असे न्यायालयात सांगितले.

तक्रारदार महिलेची बाजू मांडणाऱ्या वकिलाने आरोपीने महिलेची फसवणूक करून तिची सहमती मिळवल्याचा दावा केला. आरोपी २०१४ मध्ये महिलेला हिमाचल प्रदेशातील मनाली येथील एका मंदिरात घेऊन गेला आणि त्यांनी तेथे लग्न लावल्याचे न्यायालयात सांगितले.

लग्नाचे खोटे आश्वासन देणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेनेही अशा प्रकारचे आश्वासन देऊन नंतर शब्द फिरवता कामा नये, असे मत या त्रिसदस्यीय खंडपीठाने नोंदवले.

आरोपी व्यक्तीने केवळ महिलेचा पती असल्याचे नाटक केले. नंतर मात्र त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. आरोपीने महिलेला मारहाण केल्याचेही तक्रारदार महिलेच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. दोघांमधील शरीर संबंधाबाबतचे वैद्यकीय पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र पती-पत्नी म्हणून एकमेकांसोबत राहणाऱ्या या दोघांमधील शरीर संबंधांना बलात्कार म्हणता येईल का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आणि या व्यक्तीला अटकेपासून आठ आठवडे संरक्षण दिले.

ताज्या बातम्यांसाठी न्यूजटाऊनचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा👇

https://t.me/newstown1

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा