ग्रामपंचायत निवडणूकः ऑफलाइन पद्धतीनेही स्वीकारणार जात पडताळणीचे अर्ज

0
168

मुंबईः सर्व्हर डाऊनमुळे वैतागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छूक उमेदवारांना राज्य सरकारने शेवटच्या दोन दिवसांत दिलासा दिला आहे. या निवडणुकीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे जातप्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज २९ आणि ३० डिसेंबर असे दोन दिवस ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनेही स्वीकारण्यात येणार आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे आज २९ डिसेंबर आणि उद्या ३० डिसेंबर असे दोन दिवस जात पडताळणीचे अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

 याबाबत . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिवांना लेखी पत्र दिले आहे. विविध जिल्ह्यांतून अर्जदार, लोकप्रतिनिधी आणि समिती कार्यालयांकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची विनंती करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बार्टीने म्हटले आहे.

सर्व अर्ज स्वीकारेपर्यंत कार्यालय सुरूः अर्जदारांची संख्या विचारात घेता कार्यालय पूर्ण वेळ तसेच आवश्यकतेनुसार सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत दोन्ही दिवशी कार्यालये सुरू ठेवावीत, गरजेनुसार अर्ज स्वीकारण्यासाठी टेबल/ खिडक्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही बार्टीने दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा