४ मे ते १० जूनदरम्यान होणार सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा

0
21
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज जाहीर केल्या. ४ मे रोजी सुरु होणाऱ्या या परीक्षा १० जूनपर्यंत चालणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहेत.

परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून व्यापकस्तरावर सूचना मागवण्यात आल्या होत्या. या दरम्यान आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आम्ही यावर्षी जेईई, एनईईटी परीक्षांचेही आयोजन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात आयोजित केलेल्या परीक्षांपैकी या परीक्षा एक होत्या, असे पोखरियाल म्हणाले.

परीक्षेचे निकाल वेळेवर घोषित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. १५ जुलैपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा असल्याचे पोखरियाल म्हणाले. यापूर्वी जानेवारी- फेब्रुवारीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होत होत्या आणि मार्चपर्यंत परीक्षा संपत होत्या. परंतु यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे परीक्षांना विलंब होत आहे. विशेष म्हणजे मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास सुरुवात झाल्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे परीक्षांच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु सीबीएसईने ३० टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी केला आहे. विद्यार्थ्यांकडे पुरेसा वेळ आहे. विद्यार्थ्यांनी भक्कम इच्छाशक्तीने परीक्षा द्यावी. त्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, असेही पोखरियाल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा