मोबाइल अ‍ॅपद्वारे होणार देशातील 2021 ची जनगणना, 12 हजार कोटी रुपये खर्च

0
88

नवी दिल्ली : देशात 16 वी जनगणना डिजिटल पद्धतीने केली असून त्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिली. 2021 ची जनगणना क्रमाने 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे. जनगणनेच्या 160 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा अ‍ॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे.

देशातील सर्व नागरिकांना बहुउद्देशीय ओळखपत्र देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. या बहुउद्देशीय कार्डमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बँक खाते यासारख्या सुविधा असतील. ही सर्व माहिती एका अ‍ॅपमधून गोळा केली जाणार आहे. देशाच्या पहिल्या डिजिटल सेन्ससवर एकूण 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येईल. इतिहासात पहिल्यांदाच अ‍ॅपद्वारे ही जनगणना केली जाणार आहे. यासाठी घराघरांत जाऊन लोकांच्या मोबाइलमधून ही माहिती गोळा करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे शहा म्हणाले. देशातील जनगणना ही दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने मार्च महिन्यात दिली होती. देशात आता आधारच्या अनिवार्यतेवर चर्चा सुरू आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव ठेवला आहे.

 जनगणनेचे दोन टप्पे असे :

पहिला टप्पा : 1 मार्च 2012 पासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. जनगणना केवळ लोकांची गिणती नसेल तर त्यात सामाजिक- आर्थिक आकडेवारीही असेल, असे मागील महिन्यात गृहसचिव राजीव गौबा यांनी सांगितले होते.

दुसरा टप्पा : ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या बर्फवृष्टी होणाऱ्या राज्यात या टप्प्यात जगणना करण्यात येईल. जनगणनेसाठी 12 ऑगस्ट रोजी पूर्वचाचणी सुरू झाली होती. ती या महिन्यात पूर्ण होऊ शकते.

33 लाख लोक 16 भाषांत करणार जनगणना

जनगणना करण्यासाठी एकूण 33 लाख लोकांची मदत घेतली जाणार आहे. ही सर्व लोक घराघरांत जाऊन सर्व माहिती गोळा करतील. जनगणना एकूण 16 भाषेत केली जाणार आहे.

पहिल्यांदाच एनपीआर, ओबीसीची आकडेवारी

2012 होणाऱ्या  जनगणनेद्वारे पहिल्यांदाच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर म्हणजेच एनपीआर तयार करण्यात येणार आहे. एनपीआरच्या माध्यमातून विविध सरकारी समस्यांची उकल करण्यास मदत होणार आहे.त्यामुळे सरकारला योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत मिळेल. र या जनगणनेत पहिल्यांदाच इतर मागासवर्गीयांशी ( ओबीसी)  आकडेवारीही समाविष्ट केली जाणार आहे.

नवीन एकच कार्ड आणणार

आधार, पासपोर्ट, बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारख्या सर्व सुविधा एकाच कार्डात असणे गरजेचे आहे. आधार कार्ड, पासपोर्ट, बँक अकाऊंट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र अशा सर्व गरजा पूर्ण करेल, असे आम्हाला एकच कार्ड आणायचे आहे.

-अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

कागदोपत्री जनगणनेपेक्षा कमी वेळ

 कागदोपत्री जनगणनेपेक्षा डिजिटल जनगणनेला कमी वेळ लागेल. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोकसंख्येच्या आकडेवारीत स्वतःहून अपडेट करू शकेल, अशा तंत्राची व्यवस्था नव्या तंत्रज्ञानात असेल, असे शहा म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा