नांदेडमध्ये उभारणार कौशल्य विकासाधारित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

0
78

मुंबई: नांदेडमधील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीस कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी तत्वतः मान्यता दिली. या केंद्रासाठी जागा व इतर बाबीसंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मलिक यांनी दिले.

नांदेडमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करणे, आर्थिक मागास विद्यार्थी व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी वसतfगृह उभारणे यासंदर्भात नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या सचिव अंन्शु सिन्हा, कौशल्य विकास आयुक्त दीपक कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी तसेच कौशल्याधारित व्यवसायासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात येणार आहे. नांदेडमध्ये हे केंद्र सुरू झाल्यामुळे तेथील युवकांना चांगले प्रशिक्षण मिळणार आहे. या केंद्रासाठी २० एकर जागेची आवश्यकता आहे. तसेच सेंटर उभारण्यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मलिक यांनी दिले.

मागास विद्यार्थ्यांसाठी होणार वसतिगृहः आर्थिक मागास घटकातील विद्यार्थी तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेजमागील जागा द्यावी, अशी मागणी चव्हाण यांनी यावेळी केली. वसतिगृह उभारण्यास मान्यता देऊन यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मलिक यांनी दिले.

जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक कॉलेज यांच्यामध्ये दोन्ही विभागाची जागा उपलब्ध आहे. या जागेवर सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. ही जागा देण्यासाठी कौशल्य विकास विभागाची मंजुरी मिळावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भातही प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश मलिक यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा