मॅट्रिकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने!

0
31
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध पातळ्यांवर निर्बंध आहेत. त्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासननिर्णय नुकताच नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे.

इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबवण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने गठित केलेल्या समितीने मान्य केल्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ३० सप्टेंबरपर्यंत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थाळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105241247441916 असा आहे.    

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा