वर्षभरात देशातील सर्व टोलप्लाझा हटवणार, जुन्या गाड्यांत मोफत जीपीएस सुविधाः गडकरींची घोषणा

0
76
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशभरात फास्टॅगची संपूर्ण अंमलबजावणी करून येत्या वर्षभरात टोल घेण्याची व्यवस्था रद्द केली जाईल आणि जुन्या गाड्यांमध्ये मोफत जीपीएस सुविधा लावून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.

अमरोहाचे बसप खासदार कुंवर दानिश अली यांनी गढमुक्तेश्वरजवळी रस्त्यावर नगरपालिका हद्दीतील टोल प्लाझाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना गडकरी यांनी  मागच्या सरकारने रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटामध्ये ‘मलाई’ लाटण्यासाठी शहराच्या सीमेवर असे अनेक टोल प्लाझा बांधले आहेत. हे अन्यायकारक आहे. आता टोल प्लाझा हटवण्यात आले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या नुकसान भरपाई मागतील. परंतु सरकारने वर्षभरात सगळे टोल प्लाझा संपुष्टात आणण्याची योजना आखली आहे, असेही गडकरी म्हणाले. आगामी काळात जेवढे रस्त्यावर चालणार तेवढा टोल भरावा लागेल, अशी व्यवस्था तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाईल, असेही ते म्हणाले.

तुम्ही जिथून महामार्गावर चढाल तेथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने एक फोटो घेतला जाईल आणि तिथून महामार्गावरून बाहेर पडाल तेथेही एक फोटो घेतला जाईल. जेवढा प्रवास तुम्ही केला असेल तेवढ्याच अंतराचा टोल तुम्हाला भरावा लागेल, अशी ही टोल प्लाझा संपुष्टात आणण्याची योजना आहे, असे गडकरी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा