भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक विधानांनी दिल्लीतील वातावरण बिघडवलेः सोनिया गांधी

0
47
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनांमागे नियोजनबद्ध षडयंत्र असून दिल्ली विधानसभा निवडणुकीतही असेच षडयंत्र होते. दिल्लीतील हिंसाचारास केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देऊन भीती आणि तिरस्काराचे वातावरण निर्माण केले. असेच वक्तव्य भाजपच्या एका नेत्याने मागच्या रविवारीही केले होते, असे सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिल्लीतील या हिंसाचारामागे नियोजनबद्ध षडयंत्र आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही देशाने असेच षडयंत्र पाहिले आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. दिल्लीतील हिंसाचार, त्यामुळे बिघडत चाललेली स्थिती, जिवित व वित्त हानी याबद्दल सोनिया गांधी यांनी चिंता व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा