१८५७ च्या उठावाचा इतिहास बदलण्याचा केंद्र सरकारची संस्था ‘पीआयबी’कडून प्रयत्न!

0
163
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) म्हणजेच पत्र सूचना कार्यालयाने १८५७ च्या महान क्रांतीकारी आंदोलनाची भक्ती आंदोलन आणि स्वामी विवेकानंदांशी सांगड घालून ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जेव्हा पीआयबीची ही चूक निदर्शनास आली तेव्हा त्यांनी वादग्रस्ता मजकूर गुपचुप काढून टाकला आणि ही ही साधारण चूक असल्याचे सांगत अंग झटकून टाकले आहे. पीआयबी ही भारत सरकारची वृत्त संस्था आहे. प्रधानमंत्र्यांपासून ते सर्व केंद्रीय मंत्र्यांची वक्तव्ये आणि कार्यक्रमांची माहिती आणि त्यांच्या पत्रकार परिषदांचे आयोजनही पीआयबीकडून केले जाते.

 पीआयबीकडून न्यू इंडिया समचार नावाचे एक बुलेटिन इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रकाशित केले जाते. न्यू इंडिया समचारचा ताजा अंक सोमवारी प्रकाशित झाला. यावेळचा न्यू इंडिया समाचार फारच ‘विचारपूर्वक’ तयार करण्यात आला होता. १२ जनेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती होती. पीआयबीने ११ जानेवारी रोजीच न्यूइंडिया समाचारचा अंक जारी केला. हे बुलेटिन प्रकाशित झाले आणि लोकांमधून प्रचंड रोष व्यक्त होऊ लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या व्हॉट्सअप यूनिर्व्हसिटीचे ज्ञान किमान ऐतिहासिक संदर्भात तरी पाजळले जाऊ नये, असे सोशल मीडिद्वारे लोकांनी पीआयबीला सुनावले.

हेही वाचाः ‘त्या २८ तदर्थ सहायक प्राध्यापकां’ची पदनिर्मितीच बोगस, कायद्याच्या कसोटीवर ही वाचा पडताळणी

 न्यू इंडिया समाचारच्या नव्या अंकात एक इन्फोग्राफिक देण्यात आले आहे. त्यात ‘भक्ती आंदोलनाने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रारंभ केला. भक्तीयुगादरम्यान या देशातील संत- महंतांनी, मग ते स्वामी विवेकानंद असो, चैतन्य महाप्रभू, रमण महर्षि असो, देशाच्या चारही कानाकोपऱ्यातून या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. हे सर्व मनीषी त्यावेळी भारताच्या आध्यात्मिक चेतनेबाबत चिंतित होते. भक्ती आंदोलनाने १८५७ च्या उठावाचे अग्रदूत म्हणून काम केले,’ असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

 सोशल मीडियावर प्रचंड वादंग निर्माण झाल्यानंतर पीआयबीने गुपचुप सर्व नावे वगळून ‘इतिहासापासून प्रेरणा’ शिर्षकाखाली असलेला तो भाग बदलून टाकला. दुरूस्ती केलेल्या भागात पीआयबीने पुन्हा असे म्हटले आहे की, ‘भक्ती आंदोलनाने स्वातंत्र्य लढ्याच्या मुहूर्तमेढीचया रूपात काम केले. ज्याप्रमाणे भक्ती आंदोलनाने स्वातंत्र्य लढ्याला ताकद दिली, त्याच प्रमाणे आत्मनिर्भर भारताची प्रेरणाही तेथूनच घेण्यात आली आहे. तमाम महान हस्ती त्याच काळाशी निगडित आहेत.’ याच्या एक दिवस आधी पीआयबीने न्यू इंडिया समाचारचे कव्हर आणि इन्फोग्राफिक्सचे स्क्रीनशॉट्स एका टिप्पणीसह ट्विट केले होते. ‘स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य माणसांचा मोठा सहभाग होता. परंतु त्यापैकी अनेकांचे विस्मरण झाले आहे,’ असे पीआयबीने या ट्विटमध्ये म्हटले होते.

 कोणी त्या ऐतिहासिक घटनेनंतर (१८५७) जन्माला येऊन गदर आंदोलनाची मुहूर्तमेढ कशी काय रोवू शकतो? तोपर्यंत तर ही क्रांती होऊनही गेली होती, असे सवाल नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीआयबीला विचारले आहेत. स्वामी विवेकानंदांचा जन्म १८६३ मध्ये आणि रमण महर्षिंचा जन्म १८७९ मध्ये झाला होता, तर स्वातंत्र्यांचे पहिले युद्ध १८५७ मध्ये झाले होते, असे अनेक लोकांनी नमूद करत पीआयबीला सुनावले.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

 इतिहासकार श्रीनाथ रावघवन यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ‘भारतातील इतिहासकारांची भूमिका आता संपुष्टात आली आहे. अब पीआयबी म्हणते की…’  म्हणजेच पीआयबी आता इतिहासकाराच्या भूमिकेत आली आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता.

 पीआयबीकडून झालेल्या इतिहासाशी छेडछाड करण्याच्या या प्रयत्नावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही निशाणा साधला आहे. ‘स्वामी विवेकानंदांचा जन्म १८६३ मध्ये (म्हणजे १८५७ च्या उठावाच्या सहा वर्षे नंतर) झाला होता. रमण महर्षिंचा जन्म १८७९ मध्ये (१८५७ च्या २२ वर्षेनंतर) झाला होता. परंतु पीआयबीचे म्हणणे आहे की ते १८५७ च्या उठावाचे अग्रदूत होते. संपूर्ण इतिहासातील डीग्रीसाठी हळूच टाळ्या…’ असे ट्विट त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण इतिहासातील ‘डीग्री’चा संदर्भ विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दिल्ली विद्यापीठातील डीग्रीच्या संदर्भातही येतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा