राज्यातील मका खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढः मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

0
85

नवी दिल्लीः महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने मका खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २० जुलै रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मका खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी होती.

३१ जुलैपर्यंत मका खरेदी पूर्ण झाली नाही आणि राज्य सरकारने मागणी केली तर मका खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्यात येईल, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात मका शिल्लक होती.  केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत राज्यातील मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ आणि ९ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिली होती. तरीही अद्याप मोठ्या प्रमाणात मका खरेदी शिल्लक असल्याने खरेदीचा कोटा वाढवून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारचा पाठपुरावा सुरू होता. राज्याचे उद्योगमंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा