छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसीच होतेः महादेव जानकरांचे खळबळजनक विधान

0
224
संग्रहित छायाचित्र.

परभणीः सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे राजकारण ढवळून निघालेले असतानाच भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही ओबीसीच होते, असे विधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने १३ डिसेंबरपासून ओबीसी आरक्षणासाठी एल्गार आंदोलन करण्यात येत आहे. महादेव जानकर यांनी सोमवारी या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी बोलताना जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना थेट ओबीसी संबोधले.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षण दिले. मराठ्यांना आरक्षण होते. पण नंतर मराठ्यांचे आरक्षण का गेले? छत्रपती राजे शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. ते कुळवाडी भूषण राजा होते. पण आमच्या तथाकथित लोकांना वाटले आमचे गावच लई मोठे आहे. आम्हाला नको तसले आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे, असे जानकर म्हणाले.

माझे ३०-३५ आमदार निवडून द्या, अवघ्या १० मिनिटांत ओबीसींची गंमत करून दाखवतो. मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देतो. मुस्लीम समाजावर तर किती अन्याय झालाय ते पहा. गॅरेज, अंड्याचे दुकाने, कोंबडीचे दुकान पाहिले की तेथे मुस्लीम दिसतात. त्यांचा कुठेही डाटा नाही. काही नाही. सगळी बोंबाबोंब. हिंदूही भिकारी आणि मुस्लीमही भिकारी आणि राज्य चालवणारा तर तिसराच मालक असतो, असेही जानकर म्हणाले.

भाजपचाही ओबीसी आरक्षणाला विरोधः भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता. परंतु त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला. ओबीसींबाबत बोलले की संपवले जाते, असा आरोपही जानकर यांनी केला. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना ओबीसींचा डाटा द्यायचा नाही. आम्ही काय भाजपचे चेले नाहीत. त्यामुळे ओबीसींच्या बाबतीत जेव्हा आवाज उठवायचा असेल तेव्हा आवाज उठवू, असे जानकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा