‘छत्रपती’ हीच शिवाजी महाराजांची खरी उपाधी, रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरुही नव्हते : पवार

0
267
संग्रहित छायाचित्र.

साताराः मला ‘जाणता राजा’ म्हणा, असे मी कधीही कुणाला सांगितले नव्हते आणि जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांची उपाधीही नव्हती. ‘छत्रपती’ हीच शिवाजी महाराजांची खरी उपाधी असून जाणता राजा हा शब्द रामदास स्वामी यांनी आणला आहे. रामदास स्वामी  हे काही शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते. राजमाता जिजाऊच त्यांच्या गुरू होत्या. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, ही लेखणीची कमाल आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

 आज शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असतानाच त्यावर प्रतिक्रिया देताना शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांना जाणता राजा संबोधण्यात येत असल्याबद्दल टीका केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर आज शरद पवारांनी सातारा येथील सभेत बोलताना हे स्पष्टीकरण दिले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला तर त्यांची खरी उपाधी ‘छत्रपती’ हीच होती, जाणता राजा कधीच नव्हती, हे लक्षात येईल. जाणता राजा हे बिरुद शिवरायांना रामदास स्वामींनी पहिल्यांदा दिले, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा