मुख्य निवडणूक अधिकारी आज घेणार पदवीधर निवडणुकीचा आढावा, निर्देशांबाबत उत्सुकता

0
41
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह हे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून ते आज दुपारी पदवीधर निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. केंद्र सरकारने जारी केलेली कोरोनाची नवीन नियमावली १ डिसेंबरपासून लागू होत असून याच दिवशी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानही होत आहे. त्यामुळे ते काय निर्देश देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे प्रधान सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह हे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते दुपारी १२ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. आढावा घेऊन ते रात्री ८.२० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक अशा मतदारसंघात निवडणूक होत असलेल्या पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी केंद्र सरकारने कालच कोरोनाची नवीन नियमावली जारी केली आहे. १ डिसेंबरपासून तिची अंमलबजावणी होणार असून याच दिवशी या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे कठोर पालन, सावधगिरी आणि देखरेखीच्या उपायांची कडक अंमलबजावणी आणि निर्बंध लागू करण्याची राज्यांना मोकळीक आदी बाबींचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर बलदेव सिंह काय निर्देश देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा