सरकारी नोकरभरतीसाठीचे महापोर्टल अखेर बंद!

0
221
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारी नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले महापोर्टल बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महापोर्टलमधील त्रुटींबाबत राज्यभरातील  उमेदवारांकडून असंख्य तक्रारी आल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 डिजिटल इंडियाच्या हट्टापायी फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी अनेकदा करूनही त्याकडे फडणवीस सरकारने दुर्लक्ष केले होते. फडणवीस सरकारच्या काळातही हे पोर्टल बंद करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महापोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. विद्यार्थी आणि नेत्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर महापोर्टल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक राज्य सरकारच्या वतीने आजच जारी करण्यात आले आहे. या पोर्टलमुळे नोकरी इच्छूक उमेदवारांची सोय  होण्याऐवजी त्यांची अडचणच झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा