चीनकडून एलएसीजवळ बांधकामाचा प्रयत्न झाला होताः विरोधकांच्या टिकेनंतर पीएमओचा खुलासा

0
44
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारताच्या सीमेत कोणत्याही प्रकारची घुसखोरी झाली नाही किंवा चौकीही बळकावलेली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत टिकेची झोड उठवल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून हे विधान मोडतोड करून सादर करण्याचा प्रयत्न झाला.

भारत-चीन संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी भारताच्या सीमेत कोणतीही घुसखोरी झाली नाही किंवा चौकीही बळकावलेली नाही, असे म्हटले होते. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पंतप्रधांनांनी चीनी आक्रमणापुढे भारतीय भूप्रदेश चीनच्या हवाली करून दिला. जमीन जर चीनची होती तर आमचे जवान का व कुठे मारले गेले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. अन्य विरोधी नेत्यांनीही सरकारवर टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने खुलासा जारी केला आहे.

भारतीय जवानांनी १५ जून रोजी लडाखमध्ये चीनचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. याबाबत अनावश्यक वाद निर्माण करून जवानांचे मनोधैर्य खच्चीकरण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेबाबत( एलएसी) हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, १५ जून रोजी गलवानमध्ये झालेल्या हिंसाचाराचे कारण चीनकडून एलएसीच्या जवळ बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते बांधकाम सुरूच ठेवले होते. तसेच सीमेच्या उल्लंघनाचा प्रयत्नही मोडून काढण्यात आला. १६ बिहार रेजिमेंटच्या सैनिकांच्या बलिदानामुळे चीनचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे, असे पीएमओने दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.

एलएसीच्या आपल्या बाजकडून कोणत्याही चीनी सैनिकांची उपस्थिती नव्हती. आमच्या सशस्त्र दलांच्या बहादुरीमुळेच झाले, असे पंतप्रधानांनाचे म्हणणे होते. पंतप्रधानांनी केलेल्या विधानांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हा प्रपोगंडा असून यामुळे भारतीयांची एकात्मता कमी होणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या खुलाशात म्हटले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा