सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

0
548
प्रातिनिधिक छायाचित्र.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची (क्लस्टर डेव्हलपमेंट) संकल्पना केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारली आहे. त्यास अनुसरून सरकारने औद्योगिक समूहांच्या विकासासाठी योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना म्हणजेच एमएसआय-सीडीपी नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनेही एमएसई-सीडीपी नावाने अशीच योजना आहे.

क्लस्टर म्हणजे काय?: सामाईक सुविधा केंद्र व्यवसायाची आवश्यकता पूर्ण करणाऱ्या उद्योगांचा समूह म्हणजे क्लस्टर. सुक्ष्म आणि लघु उद्योगांची उत्पादकता, स्पर्धात्मकता आणि क्षमता वाढवण्यासाठी सुक्ष्म आणि लघु उद्योग क्लस्टर विकास कार्यक्रम केंद्र सरकार (एमएसई- सीडीपी) आणि महाराष्ट्र सरकारकडून (एमएसआय-सीडीपी) राबवला जात आहे.

आवश्य वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

सदर योजनेतून सुक्ष्म व लघु उपक्रमाच्या सर्वांगीण विकास व वाढीकरिता क्षमतावृध्दी कार्यक्रम अंमलबजावणीसाठी तसेच सामाईक सुविधा निर्मितीसाठी (कॉमन फॅसिलिटी सेंटर) अनुदान देण्यात येते. सामाईक सुविधा केंद्राअंतर्गत (सीएफसी) संशोधन व विकास केंद्र, पॅकेजिंग केंद्र चाचणी तसेच प्रशिक्षण केंद्र, सामाईक जलनिस्सारण केंद्र, सामाईक प्रक्रिया केंद्र इत्यादी बाबींचा समावेश होतो.

किती  मिळते अनुदान?:  महाराष्ट्र सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या एमएसआय-सीडीपी योजनेत प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त १० कोटी किंवा ८० टक्के अनुदान दिले जाते. तर केंद्र सरकारच्या एमएसई-सीडीपी योजनेत प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त २० कोटी किंवा ९० टक्के अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होण्यासाठी किमान १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागतो.

 काय लागतात कागदपत्रे?: एमएसई- सीडीपी आणि एमएसआय-सीडीपी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे कादगपत्रांची पूर्तता करावी लागते. ती अशी-

  • विशेष प्रयोजन माध्यम संस्था म्हणून कंपनी कायदा २०१३ नुसार नोंदणीकृत असलेली सेक्टर-८ कंपनी.
  • सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यूनिट्सची उद्यम नोंदणी.
  • सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यूनिट मालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड.

 तुम्हालाही एमएसई-सीडीपी आणि एमएसआय-सीडीपी योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर चेतन भुतडा यांच्या +918855098984 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

औद्योगिक समूह विकास योजनेंतर्गत सामायिक सुविधा केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजुरीप्राप्त प्रकल्पांची ही आहेत काही उदाहरणेः

प्रिटिंग क्लस्टर, जिल्हा नांदेड.

रबर क्लस्टर, जिल्हा औरंगाबाद.

खवा क्लस्टर,ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद.

टायनी जनरल इंजिनिअरिंग अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज क्लस्टर, औरंगाबाद.

ऑटो काम्पोनन्ट क्लस्टर, औरंगाबाद.

प्रिंटिंग क्लस्टर, औरंगाबाद.

प्रिंन्टिंग क्लस्टर, उदगीर लातूर.

ऑटो ॲण्ड इंजिनिअरिंग क्लस्टर, अहमदनगर.

गोल्ड ऑर्नामेंट क्लस्टर, जळगांव.

इंजिनिअरिंग क्लस्टर,जळगांव.

राईस मिल क्लस्टर, चार्मोशी, जिल्हा गडचिरोली.

राईस मिल क्लस्टर, सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया.

जॅगरी क्लस्टर, कासा-बिरसोला, जिल्हा गोंदिया.

प्रिटींग क्लस्टर, आंबेगांव, जिल्हा पुणे.

कॅश्यू क्लस्टर, शृंगारवाडी, जिल्हा कोल्हापूर.

कॅश्यू क्लस्टर, लांजा, जिल्हा रत्नागिरी.

रेझिन मेकिंग क्लस्टर, कवठेमहाकाळ, जिल्हा सांगली.

रेझिन मेकिंग क्लस्टर, ता. पंढरपूर, जिल्हा सोलापूर.

मे. गारमेंट क्लस्टर, जिल्हा अमरावती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा