निश्चिंत रहा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणारः मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

0
484
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहे. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसानेही पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता निश्चिंत रहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जे विकेल तेच पिकेल ही योजना शासनाने राबवण्यास सुरुवात केली असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांत जनजागृती सुरु केली आहे. हमीभाव नाही तर पिकांना हमखास भाव मिळेल यादृष्टीने शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये सांगड घातली जाणार आहे. शासनाने महाओनियनचे सहा प्रकल्प राज्यात सुरु केले. केवळ कांद्यांसाठीच नाही तर कापूस, तूर, मुग, अशा विविध शेतपिकांसाठी साठवणुकीची, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था शासन उभी करत आहे, असे ठाकरे म्हणाले.

हेही वाचाः मंदिरे उघडा म्हणायला तुमचे काय जाते?: मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतले भाजपला फैलावर!

कृषी कायद्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाहीः केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी शासन संवाद साधत  आहोत. म्हणाले की, कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कोरोनाविरुद्ध लोकलढा उभारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्यः महाराष्ट्र हे जगातील एकमेव असे राज्य असेल जिथे जनतेला विश्वासात घेऊन शासन कोविड विरोधात लढा उभारत  आहे. या मोहिमेत आतपर्यंत 1 कोटी 18 लाख 56 हजार कुटुंबांना भेट देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, असे सांगातनाच आरोग्य तपासणीसाठी घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन  ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा