मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
15
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गेल्या आठवड्यात कोसळलेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या स्थितीत बळीराजाला धीर देऊन त्यांचे अश्रु पुसण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील गावांची पाहणी करून मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

राज्यात यंदा सर्वदूर पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्ग अतिशय आनंदात होता. पण परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजन टाकले. अतिवृष्टीने शेतातील उभी केलेली पिके मातीमोल आणि घरांची पडझडही झाली. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. त्यापाठोपाठ आता ते बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

बुधवारी सकाळी  १० वाजता उस्मानाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल. त्यानंतर ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी काटगाव अपसिंग गावांना भेटी देणार आहेत. तेथून ते  तुळजापूरकडे प्रयाण करतील. तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर सोलापूर येथून ते विमानाने मुंबईकडे निघणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा