मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
सोमवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण सकाळी ९.३० वाजता सोलापूर येथून मोटारीने अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खूर्दकडे मुख्यमंत्री प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील आणि ग्रामस्थांशी चर्चा करतील.
तेथून बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता अक्कलकोट हत्ती तलावाची पाहणी करतील. दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांचे रामपूर येथे आगमन होईल. तेथे ते अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करतील.
त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री बोरी उमरगे येथे आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करतील. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री सोलापूर येथे पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि अभ्यागतांच्या भेटी घेतील, असे कळवण्यात आले आहे.