जास्त अंगावर याल तर ‘हात धुवून’ मागे लागेनः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला गर्भित इशारा

0
572

मुंबईः जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता दिला आहे. विकृत बुद्धीचे चाळे करू नका, कारण विकृती ही विकृतीच असते, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

 महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो राऊत यांनी ‘उद्या धमाका’ म्हणत ट्विरवर शेअर केला असून या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री ठाकरे अनेक प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत.

हेही वाचाः ‘सज्ञान तरुणी’ तिच्या इच्छेनुसार कुठेही आणि कुणाही सोबत राहण्यास स्वतंत्र!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवायला सांगण्यापलीकडे काय करतात? असा थेट प्रश्न संजय राऊत यांनी या मुलाखतीत मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला. त्यावर ‘ठिक आहे, हात धुतो आहे. जास्त अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन,’ असा गर्भित इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता दिला आहे. विकृत बुद्धीचे चाळे करू नका. कारण विकृती ही विकृतीच असते, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कसे वाटते? महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे? महाराष्ट्र  आत्मनिर्भर कधी होणार? असे अनेक प्रश्न संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना या मुलाखतीत विचारले आहेत. आव्हान मिळाले की मला जास्त स्फूर्ती मिळते. कुणी कितीही आडवा आला तरी त्याला आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे या प्रोमोमध्ये व्यक्त करताना दिसत आहेत.

हेही वाचाः प्रत्येक दहापैकी नऊ भारतीयांच्या सामाजिक संपर्कात किमान एक तरी कोरोनाबाधित व्यक्ती!

महाविकास आघाडी सरकार आज कोसळणार, उद्या कोसळणार अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर असल्याचे आणि सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची ही मुलाखत लक्षणीय ठरणार असून ते या मुलाखतीत विरोधकांच्या कसा समाचार घेतात, याबाबतची उत्सुकता लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा