भाजप युवा नेत्या पामेला गोस्वामींजवळ सापडले ९० ग्रॅम कोकेन, ड्रग्ज तस्करीचा पोलिसांना संशय

0
130
छायाचित्र सौजन्यः twitter

कोलकाताः पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याची तयारी करत असलेल्या भाजपच्या एका युवा नेत्यांकडून पोलिसांनी ९० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्यामुळे भाजपवर चांगलीच टीका होत आहे. भाजपच्या या युवा नेत्याचे नाव पामेला गोस्वामी आहे आणि त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या महासचिव आहेत. पामेला ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू आहे.

पामेलाला शुक्रवारी दक्षिण कोलकात्यात एक मित्र आणि सुरक्षा रक्षकांसह ९० ग्रॅम कोकेन बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बाजारात या कोकेनची किंमत १० लाख रुपये आहे. पोलिसांना पामेलाच्या कारमध्ये हे कोकेन सापडले. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार न्यू अलीपूर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एका होंडा कारची झाडाझडती घेतली. त्यात हे कोकेन आढळून आले, असे दक्षिण कोलकाता झोनचे उपायुक्त सुधीर कुमार निलकंठम यांनी सांगितले. पामेला अंमली पदार्थांची विक्री आणि सेवनात सहभागी असावी, असा पोलिसांना संशय आहे. पामेला अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी आहे का, या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा