नरेंद्र मोदींशी तुलना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानचः भाजपच्या माजी आमदाराची मुक्ताफळे

0
190
संग्रहित छायाचित्र.

इचलकरंजीः आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या पुस्तकावरून महाराष्ट्रभर काहूर माजले असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना करणे चुकीचे नाही. मोदींशी तुलना हा शिवरायांचा सन्मानच आहे, अशी मुक्ताफळे भाजपचे इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी उधळली आहेत. हाळवणकर यांनी पुस्तकाच्या लेखकाचे समर्थनही केले आहे.

शिवरायांशी मोदींची तुलना केल्यामुळे महाराष्ट्रभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. अशातच हाळवणकर यांनी शिवरायांशी मोदींची तुलना करण्यात गैर काहीच नसल्याचे म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदी यांनी केलेल्या कामात साम्य आहे. या युगात मोदींनी केलेले काम नक्कीच दखलपात्र आहे, असे हळवणकर यांनी भाजपच्या बैठकीत सांगितले. हळवणकर यांनी मोदी राबवत असलेल्या योजनांचे फुटकळ दाखले देत या तुलनेचे समर्थन करून महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा