भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या मुलीविरूद्ध सासू तेजस्विनी जाधव यांची पोलिसांत तक्रार

0
4757
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः संजना जाधव या सुनेने आपणास शिविगाळ केली असून तिच्यापासून आपल्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्या आई माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात केली आहे. संजना या भाजप नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.

 संजना यांच्या सांगण्यावरूनच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात औरंगाबादेत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना काही तरी करून अडकवून ठेवायचे म्हणून रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरूनच हे सर्व करण्यात येत आहे, असा आरोपही तेजस्विनी जाधव यांनी तक्रारीत केला आहे. माझी सून संजना सकाळपासूनच मला शिविगाळ करत आहे. तिला रावसाहेब दानवे यांचीच फूस आहे. तिच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्यामुळेच मी तक्रार देत आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

तेजस्विनी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी संजना जाधव यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू- सुनेतील भांडण विकोपाला जाऊन ते थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. तेजस्विनी जाधव यांच्या तक्रारीवरून संजना जाधव यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा