शरद पवारांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोलिसात तक्रार, राजकीय वर्तुळात खळबळ

0
731
संग्रहित छायाचित्र.

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुण्याच्या सायबर पोलिसांत दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर आणि एका वेबपोर्टलच्या विरोधात ही तक्रार दिली आहे. भाऊ तोरसेकर व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार शरद पवारांच्या हत्येसाठी चिथावणी देण्यात येत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. गोपनीय आणि तातडीची तक्रार म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाऊ तोरसेकर, धनश्याम पाटील आणि इतर लोकांकडून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशा आशयाच्या चिथावण्या देण्यात येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचा कटही रचला जात असल्याचे खाबिया यांच्या तक्रारीत म्हटले आहे. पुणे सायबर पोलिसांनी या तक्रारीची नोंद करून घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा