शरद पवार नाराज झाले तरच महाराष्ट्रातील सरकार पडेलः दिल्लीत गेलेल्या काँग्रेस नेत्यांचे ‘बौध्दिक’

0
196
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली/मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचे मुहूर्त भाजपकडून वारंवार सांगितले जात असतनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार जोपर्यंत या सरकावर नाराज होणार नाहीत, तोपर्यंत हे सरकार पडणार नाही, असे दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांनाच पक्षश्रेष्ठींनी सुनावले आणि ते परत आले, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसचे कोषाध्यक्ष अहमद पटेल आणि आणि संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. त्यावेळी त्यांना हा निरोप दिला गेल्याचे सांगण्यात येते.

महाराष्ट्र विधानसभेच्या १२ जागा रिक्त आहेत. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने प्रत्येकी ३ जागा घ्याव्यात असे सूत्र ठरवण्यात आले. पण शिवसेना ५ जागा मागत आहे. यावरही महाविकास आघाडीच्या बैठकीत तोडगा निघेल, असे संकेत आहेत.

कोश्यारींना निरोपः सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असा निरोप भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पोहोचवण्यात आला होता. त्यानुसारच ते काम करत होते. विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांच्या बाबतीत त्यांनी घेतलेली भूमिका ही भाजपचीच भूमिका होती, हे नंतर भाजप, एबीव्हीपी यांच्या निवेदनावरून स्पष्ट झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा