ठाकरे सरकार संविधानाच्या चौकटीत चालले नाही तर आम्ही आम्ही बाहेर पडूः अशोक चव्हाण

0
778
संग्रहित छायाचित्र.

नांदेडः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार संविधानाच्या चौकटीतच चालले पाहिजे. तसे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचे अशा कडक सूचना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्या असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. हे सरकार संविधानाच्या चौकटीतच चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु आम्ही त्यांना राजी केले. तीन पक्षांचे, तीन विचारांचे सरकार चालणार कसे, हा प्रश्न होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठी परवनागी द्यायला अजिबात तयार नव्हती. तेव्हा मी त्यांना सांगितले की, तुम्ही अजिबात चिंता करू नका. दोन पक्षाचे सरकार चालवण्याचा मला अनुभव आहे. त्यात तिसरा शिवसेना पक्ष सहभागी झाला आहे, असे मी त्यांना सांगितले. संविधानाच्या चौकटीतच हे सरकार चालले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सोनिया गांधी यांच्याही तशाच कडक सूचना आहेत. संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनीही घेतली. त्यामुळेच हे सरकार स्थापन झाले, असा गौप्यस्फोट चव्हाणांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा