संयम आणि वेळ हे सर्वात शक्तिशाली योद्धेः राहुल गांधींनी करून दिली ज्योतिरादित्यना आठवण

0
296
राहुल गांधी यांनी रिट्विट केलेले जुने छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशावर राहुल गांधी यांनी ‘संयम आणि वेळ हे सर्वात शक्तिशाली योद्धे आहेत ’ हे लिओ टॉलस्टॉय यांचे प्रसिद्ध वाक्य लिहून एक जुना फोटो ट्विट केला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी संयम पाळला नाही आणि योग्यवेळेची प्रतीक्षाही केली नाही, असे राहुल गांधीनी यातून सुचवले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे १८ वर्षे काँग्रेसचे प्राथमिक सदस्य होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे. ते राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू मित्रांपैकी एक होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा सोपवल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष असताना राहुल काँग्रेस मुख्यालयात ज्या ठिकाणी बसत होते, तीच जागा त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना बसण्यासाठी दिली होती. तरीही त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल गांधी यांनी १३ डिसेंबर २०१८ रोजी ज्योतिरादित्य आणि मध्य प्रदेश प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सोबत ट्विट केलेले छायाचित्र आज पुन्हा रिट्विट केले आहे.  आणि संयम आणि वेळ हे दोन सर्वात मोठे योद्धे असल्याची आठवण करून दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा