फोडाफोडीच्या नादात तेल स्वस्त झाल्याचे विसरले, लोकांना लाभ द्याल का?: राहुल यांचा मोदींना टोला

0
264
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः  काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत निकटचे मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपने गळाला लावल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. लोकांनी निवडून दिलेले काँग्रेस सरकार अस्थिर करण्याच्या नादात पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिकस्तरावर तेलाच्या किंमती घसरल्याचा विसर पडला आहे, अशी टीका करत पेट्रोलच्या किंमती ६० रुपये लिटर करून लोकांना त्याचा लाभ द्याल का, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया नोंदवत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘लोकांनी निवडून दिलेले काँग्रेस सरकार अस्थिर करण्यातच तुम्ही एवढे व्यस्त आहात की, जागतिकस्तरावर तेलाच्या किमती ३५ टक्क्यांनी घसरल्या, याचा तुम्हाला कदाचित विसर पडलेला दिसतो. कृपया, पेट्रोलचे प्रतिलिटर दर ६० रुपयांपर्यंत कमी करून भारतीय नागरिकांपर्यंत त्याचा लाभ तुम्ही पोहोचू शकाल का?’, त्यामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान कार्यालयाला लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा